हाय प्रोफाईल लग्नात विषबाधा

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- ५ जून रोजी साकोली येथे एका लग्नाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात पाच हजार लोक उपस्थित होते. ८ जूनच्या संध्याकाळपर्यंत ३७ लोकांना विषबाधा झाल्याने साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. हे लग्न एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मुलीचे असल्यामुळे या लग्नात गोंदिया भंडारा येथील दोन्ही जिल्ह्यातील नामांकित राजकीय मंडळी, मोठे व्यापारी, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे हे लग्न हाय प्रोफाईल असल्यामुळे या लग्नासमारंभात मोठ्या प्रमाणावर पाहुण्यांची गर्दी होती. साकोली शहरात तीन दिवसांपूर्वी ५ जून रोजी झालेल्या एका लग्न समारंभात सुमारे १०० जणांना विषबाधा झाली. ६ ते ८ जूनपर्यंत रुग्ण एकामागून एक साकोली रुग्णालयात उपचारासाठी येऊ लागले. परिणामी, ३७ जणांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले आणि त्यांच्यावर उपचार सुरू करावे लागले. तर काही जणांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *