जिवंत विद्युत तारांना स्पर्श, दोन गाईसह म्हैस ठार

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पिपरी चुन्नी गावाचे शेजारी असणाऱ्या शेतात चराईसाठी सोडण्यात आलेल्या जनावरांना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने दोन गाईसह एक म्हैस ठार झाली आहेत. ही जनावरे शेतकरी दर्याराव दसाराम पटले यांचे मालकीचे होते. ही घटना आज बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. यात जनावर मालकाचे एक लाखाचे नुकसान झाले. वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. मंगळवारच्या सायंकाळी सिहोरा परिसरात वादळ वारा आणि पावसाने हजेरी लावली. शेत शिवारात अनेक झाडे कोसळली आहे. यात वीज वितरण कंपनीचे नुकसान झाले आहेत. सायंकाळच्या वादळ वाऱ्याने पिपरी चुन्नी गावाचे शेत शिवारात विजेचे खांब कोसळले होते.

शेतात कोसळलेल्या खांबाचे विद्युत तारा जमिनीवर पडलेल्या होत्या. या तारामधून विद्युत प्रवाह सुरु असल्याची कल्पनाशेतकऱ्यांना नव्हती. दरम्यान आज बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावातील शेतकरी दर्याव दसाराम पटले यांनी मालिकीचे दोन गाई आणि एक म्हैस चरण्यासाठी गावाचे शेजारी असणाऱ्या शेतात सोडले. ह्या जनावरांना जिवंत विद्युत ताराचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती वीज वितरण कंपनी सिहोरा कार्यलयात देण्यात आली. माहिती मिळताच शाखा अभियंता दिनेश सिडाम यांनी घटना स्थळाला भेट दिली. याशिवाय सरपंच विजय पटले, आणि गावातील अन्य नागरिकांनी भेट दिली. यात शेतकरी दर्याराव दसाराम पटले यांचे एक लाखाचे नुकसान झाले. घटनेची माहिती सिहोरा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *