खडकी ते ढिवरवाडा सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- खडकी ते ढिवरवाडा रस्ता पुर्णतः खराब झाला आहे. नागरीकांना रहदारी करण्याकरीता मोठा त्रास सहन करावा लागत होता. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजु भाऊ कारेमोरे यांनी दखल घेवून निधी मंजुर केला. रस्त्याचे टेंडर काढून गोंदिया येथील ठेकेदाराला काम देण्यात आले. पण हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सविस्तर असे की, खडकी ते ढिवरवाडा पर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.
परंतु सिमेंट रस्त्याच्या काम दर्जेदार नसून निकृष्ट दर्जाचा काम करीत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. सिमेंट रस्त्याचे कामात रेती, गिठ्ठी प्रमाण जास्त होत असून सिमेंटचे प्रमाण आहे. काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. ठेकेदार व संबंधित अभियंता कामावर राहत नसल्याने त्यांचे दिवानजी मार्फत कामाची देखरेख असते. त्या कामाबाबतीत काही लोकप्रतिनिधींना विचारले असता ते काम अती निकृष्ट दर्जाचे होत आहे. तर यामध्ये काही सुधारणा करा. तर त्यांचे कडून बोलले जाते की आमचे काम बरोबर आहे, तुम्ही कोण बोलणारे आहात. आमचे मालक म्हणेल असे उध्दट भाषा दिवानजीकडून वापरली जात आहे. खडकी ते भंडारा मार्गावरून नेहमी येणाऱ्या जाणाऱ्याची वदर्ळ असते.
त्यामुळे सिमेंट रस्त्याचे काम चांगले व्हायला पाहिजे समजा काम निकृष्ट दर्जाचे झाले तर दोन महीन्यात सिमेंट रस्ता उखडेल. यामध्ये काही सिमेंट रस्ता बनवून तथ्य राहणार नाही. कामावरील असलेल्या दिवानजी ला सरपंच अश्विन बागडे यांनी ठेकेदार चे मोबाईल नंबर मागीतले असता नंबर देण्यासाठी टाळाटाळ केले परंतु नंबर दिला नाही. त्यामुळे खडकी ते ढिवरवाडा सिमेंट रस्त्याचे काम योग्य पध्दतीने करण्यात यावा जेणेकरून नागरीकांना सुध्दा त्रास होणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग कडून सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने कामाची चौकशी करावी चांगल्या पध्दतीने कामात सुधारणा करून सिमेंट रस्ते दर्जेदार करण्यात यावा अशी मागणी खडकी येथील सरपंच अश्विन बागडे यांनी केली आहे.