उच्च प्राथमिक गटात तुमसर तर प्राथमिक गटात लाखनी तालुका चॅम्पियन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय सांघिक, वैयक्तिक क्रीडा व सांस्कृतिक विभागात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करुन उच्च प्राथमिक विभागात पंचायत समिती तुमसर तर प्राथमिक विभागात लाखनीने चॅम्पियन चषक पटकावला. जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दि. २० ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीत महालगाव ता. साकोली येथे करण्यात आले होते.

या महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप ताले यांच्या शुभहस्ते, शिक्षण सभापती रमेश पारधी, समाजकल्याण सभापती मदन रामटेके, उपविभागीय अधिकारी साकोली अश्विनी मांजे, पंचायतसमिती साकोली नवनिर्वाचित सभापती ललित हेमणे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप सार्वे, उमेश पाटील, पंचायत समिती साकोलीचे गटविकास अधिकारी पी. व्ही. जाधव, शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र सलामे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवराम गिèहेपुंजे, महालगावचे सरपंच नंदकिशोर कावळे, उपसरपंच ज्योती खोटेले तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्यगण सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षक संघटना पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन शिक्षणाधिकारी प्राथमिक रविंद्र सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय आदमने, गटशिक्षणाधिकारी साकोली यांनी केले. या महोत्सवात नैपुण्य चषक उच्च प्राथमिक गटात पंचायत समिती, तुमसरने पटकावला. तर प्राथमिकगटाचा नैपुण्य चषक पंचायत समिती लाखनीने पटकावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *