
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- भारत सरकार विधि व न्याय विभागातर्फे लाखनी येथील अॅड. प्रशांत भाऊराव गणवीर यांची केंद्र शासनाद्वारे नोटरी म्हणून निवड करण्यात आली. अॅड. प्रशांत गणवीर हे लाखनी, भंडारा येथे विविध वर्षापासून वकिलीचा व्यवसाय करीत असून अनेक सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक व युवक संघटनांसोबत ते जुडलेले आहेत. त्यांची नोटरी म्हणून नियुक्त झाल्यामुळे लाखनी परिसरातील युवक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार यांना सोयीचे होईल. अॅड. प्रशांत गणवीर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.