अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या चक्काजाम आंदोलनाला यश

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- टाकळी येथील शेतकèयांच्या अन्यायाला वाचा फफोडण्यासाठी अन्यायग्रस्त शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला जिल्हाधिकाèयांनी आश्वासन दिल्याने यश प्राप्त झाले. भंडारा शहरापासून जवळ असलेल्या टाकळी येथील शेतकèयांनी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाèयाचे नेतृत्वात कोथुर्णा रोड पुनर्वसन टाकळी येथे चक्काजाम आंदोलन करून जिल्हाधिकारी संजय कोलते यांना मागण्याचे निवेदन दिले. जुनी टाकळी येथील शेत जमीन गोसेखुर्द पाण्याच्या वाढीव पाण्यामुळे बुडत आहे. यापूर्वी केलेला सव्र्हे चुकीचा असून ज्या शेतकèयांची शेतजमीन बुडीत नाही ती शेतजमीन घेण्यात आली.तर जी शेतजमीन पाण्याखाली येत होती ती वळगण्यात आली. त्यामुळे तत्काळ पुन्हा सव्र्हे करून अन्यायग्रस्त शेतकèयांना न्याय मिळावा यासाठी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांना भेटून देण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी प्रकरण समजून घेतले व तत्काळ चौकशी करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर ,धनराज राहटे ,किसन रहाटे, रमेश निखार, सौ जोशना लिमजे, रमेशचंद्र लोणारे, राजू बोरकर, शामराव भेदे, सुनील भेदे, देविदास देशकर, संजय राघोर्ते, शंकर गायधने, दिनेश गायधने, सुरेश राहाटे, अक्षय बोरकर, कोठीराम पवनकर, मंगल उरकुडे, दिलीप बोरकर, सुरेश भारत्वाज, देवा भेदे, भरत भेदे, श्रीकांत निखार, शिवलाल राहाटे, चंदू लोणारे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *