
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- विना परवाना रेती वाहतूक करणाèया एक सारखे नंबर असलेल्या दोन एल पी ट्रकवर मोहाडी पोलिसांनी येथील जुना बस स्टॉप चौक येथे कारवाई करून एक कोटी ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चार लोकांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. रेती चोरी होऊ नये म्हणून सध्या पोलिसांची कडक मोहीम सुरू आहे. मंगळवारी रात्री ८.१५ वाजता जुना बस स्टॉप चौक मोहाडी येथे पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना एलपी ट्रक क्रमांक एम.एच. ४०/ सि.एल. ४१९८ आणि एम.एच. ४०/ सि.एम.४१९८ हे कागदपत्रांची पडताळणी केली असता विना परवाना अंदाजे १५ ब्रास रेती भंडारा कडे वाहून नेतानाआढळले. या प्रकरणी आरोपी राजेशकुमार विश्वकर्मा, व शेख सद्दाम शेख दोन्ही रा. विजयापाणी जि. शिवनी (म.प्र.) तसेच सहदेव पारधी व महादेव पारधी दोन्ही रा. देवलापार जि. नागपूर यांच्यावर कलम ३०३(२), ४९, ३(५), भा.न्या.सं., सहकलम ४८(८) म.ज.म. कायदा, सहकलम ७, ९, पर्यावरण सुरक्षा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दोन्ही एल पी ट्रक किंमत एक कोटी आणि दोन्ही ट्रक मध्ये असलेली रेती १५+१५ ब्रास ३० ब्रास चे ९० हजार असे एक कोटी ९० हजार रुपयांचा साहित्य जप्त करण्यात आला. ही कामगिरी येथील पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे व त्यांच्या चमुने केली. पुढील तपास पोहवा त्रिमूर्ती लांडगे हे करीत आहेत.