शासकीय आयटीआय ला थोरपुरूषांचे नाव द्या!

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहरातील नवीन टाकळी येथील शासकीय आय. टी. आय. चे नामकरण करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत असुन सदर आयटीआय ला देशासाठी विरगती प्राप्त झालेल्या थोरपुरुषांचे नाव देण्यात यावे अशी मागणी राष्टड्ढीय मानवाधिकार सुरक्षा समीतीचे वतीने भंडारा जिल्हाधिकारी यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. शासकीय आयटीआयला कुण्या आजीमाजी राजकीय लोकप्रतिनिधीचे नाव दिल्यास दि. २६ जाने. २०२५ पासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. भंडारा शहरातींल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हजारोच्या संख्येने विद्यार्थीलांबदुरहुन प्रशिक्षण घेण्याकरीता येत असतात. मात्र या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण दि. २५ जानेवारी २०२५ ला करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. सदर संस्थेला एका माजी स्वर्गीय आमदाराचे नाव देण्याचे निश्चित केले असल्याचीही चर्चा आहे. शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण करुन नवीननाव द्यायचे असेल्यास देशासाठी झटणारे, देशासाठी आपल्या जीवाची आहुती देणारे, देशासाठी बलीदान देणारे थोरपुरुष होऊन गेले त्यांचे नाव देण्यात यावे.

सदर संस्था ही शहीद भगतसिंग वार्डच्या समोर आणि राजेंद्र वार्डात येत असल्याने या शहीद भगतसिंग यांचे नावे किंवा राजेंद्र वार्डात येत असल्याने राजेंद्र प्रसाद यांचे नाव द्यायला काहीही हरकत नाही. कोणत्याही थोरपुरुषांचे नाव द्याायला काहीही हरकरत नाही.राजकीय हेतुने एका राजकीय पक्षाच्या स्वर्गीय माजी आमदाराचे नाव देणे हे जनतेच्या भावनेशी खेळणे होय.करीता संस्थेचे जुनेच नाव असले पाहिजे संस्थेचे नामकरण करायचे असल्यास सदर संस्थेला थोरपुरुषांचे नाव देण्यात यावे अन्यथा समिति मार्फत २६ जानेवारी २०२५ पासुन भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद्दत उपोषण करण्याचा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे. निवेदन देताना राष्टड्ढीय मानवाधिकार सुरक्षा समीतीचे विदर्भ अध्यक्ष सुरज दिलबहादुर परदेशी, राहुल थोटे, राजेश तांडेकर, राज शेख, महेश पचारे, महेंद्र देशपांडे, लक्ष्मीकांत दांडेकर, बबन बूंधे, दिपक वाघमारे, राजकुमार दहेकर, महेश कटारे, रामकिशोर संदेले, नम्रता बागडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *