
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- जगदगुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य सेवा संस्थान आयोजित यांच्या माध्यमातून दि.१७ जानेवारी २०२५ रोजी साकोली तालुक्याच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने आशिष गुप्ता यांनी आजपर्यंत ४७ वेळा रक्तदान केले आहे. आणखी ३ वेळा रक्तदान करून अर्धशतक पूर्ण करण्याचा उद्देश आशिष गुप्ता यांनी घेतला आहे. तसेच युवांना सुधा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आव्हान आशिष गुप्ता यांनी केले.