जिल्हा परिषद शाळा बोरगावच्या विद्यार्थ्यांना बॅग वाटप

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :-जिल्हा परिषद शाळा बोरगाव येथे कनक, कलश व कशिश वि क्लबच्या संयुक्त वतीने लहान मुला मुलींना काल २० जानेवारी रोजी स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. तर यात वार्ताहर रामलाल बिसेन, जितू पटले, धीरज गजभिये व पंकज शुक्ला यांचे सुद्धा शाल व श्रीफळ देऊन क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आले. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अध्यक्षा दीपाताई टेंभेकर यांनी विद्येचे दैवत सरस्वतीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात केली. आमच्या वि क्लबची स्थापना २०१९ अशी असून क्लबच्या वतीने नवीन बसस्थानकावर मुला मुलींसाठी वेंडिंग (पॅड) मशीन लावण्यात आली आहे. पोलीस स्टेशन तुमसर येथे बसण्याकरिता सिमेंटचे सोपे देण्यात आले आहेत.गरीब, बहिèया व गरजू लोकांना कानात लावण्यासाठी मशीन देण्यात आली आहे. अपंगांना व ज्ञान गंगा मतिमंद शाळेमध्ये सुद्धा व्हील चेअर देण्यात आले. तर एका गरीब मुलीच्या लग्न समारंभाला सुद्धा २५ हजार रुपया पर्यंतची मदत देण्यात आली आहे.

दरवर्षी शासकीय रुग्णालयात नवजात मुलांना स्वेटर व मातांना शाक्स पुरविले जात असल्याचे क्लबच्या संस्थापिका मंजुश्री जयस्वाल यांनी सांगितले.तर नवभारतचे वार्ताहर जितू पटले यांनी वि क्लबच्या वतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम हे प्रशंसनीय व कौतुकास्पद आहेत या केलेल्या कार्याचे कौतुक करित पुढील कार्य उत्साहाने,जोमाने व दृढ निश्चय पुढे ठेवून करावे आमच्या पत्रकारांची चमू सदैव आपल्या सोबत उभी राहील अशी ग्वाही सुद्धा जितु पटले यांनी आपल्या समारोपीय भाषणातून दिली. यावेळी ग्रामपंचायत बोरगावच्या सरपंचा दीपा ताई टेंभेकर, मुख्याध्यापक अंबुले, वी क्लब कनक, कलश व कशिषच्या अध्यक्ष हर्षा वाहने, ज्योत्स्ना पुजारी, प्रभा सोनकर सचिव ज्योती भोयर, जयश्री गोस्वामी, रंजना ठाकरे ट्रेझर शेषना कवाने, गुड्डी अंबुले, स्नेहा जयस्वाल, सदस्य निमा रिनायत, राजश्री लांजेवार, लता उके, माया जयस्वाल, शालिनी राऊत, विशेष शिक्षिका प्राजक्ता अंबुले, प्रल्हाद गौतम, ग्रा.पं.सदस्य अर्चना पटले, कल्पना धमगाये, आशा सेविका वनिता रिनाईत व आरती तुरकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *