
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- नेहमीप्रमाणे सकाळी १०.०० वाजता शाळेत गेले. पण अचानक प्रकृती बिघडल्याने शाळेतून घरी परत येताच मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. २१ जानेवारी रोजी पालोरा (जांभोरा) येथे घडली. गोविंद मुंजाजी आव्हाड (वय ४०) रा. जिंतूर, जि. परभणी, हल्ली मुक्काम पालोरा असे आहे. सविस्तर असे की, मोहाडी पंचायत समितीतील करडी केंद्र अंतर्गत येणाèया मोहगाव येथे गोविंद आव्हाड हे मुख्याध्यापक होते. आज मोहगाव शाळेत येथे १० वाजे हजर झाले. परंतु अचानक प्रकृती बिघडल्याने पालोरा येथे घरी पोहोचताच ११.३० वाजेच्या दरम्यान मृत्यू पावले. त्यामुळे अचानक केंद्रातील शिक्षक वर्गात एक धक्का पोहचला आहे. उद्या २२ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ११.०० वाजता जिंतूर जि. परभणी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील व आप्त परिवार आहे.