दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- अपंगत्व किंवा दीव्यांग ही मर्यादा नाही, ही एक वेगळी क्षमता असते, हे आपल्याला अपंगांच्या क्रीडा स्पर्धा सांगून देतात. या स्पर्धांमध्ये अपंग खेळाडू आपली कौशल्ये दाखवून आपल्या मर्यादांवर मात करून आपल्याला प्रेरणा देत असल्याने दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा प्रेरणादायी ठरल्या आहेत. असे प्रतिपादन स्पर्धेचे उद्घाटक खासदर डॉ. प्रशांत पडोळे यांनी केले. ते जागतिक दिव्यांग दिनाचे व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ चे औचित्य साधुन समाज कल्याण समिती, जि.प. भंडाराचे विद्यमाने, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा यांचे अधिनस्त कार्यरत शासकीय, अनुदानित, विना अनुदानित व कायम विना अनुदानित दिव्यांग शाळा/ कर्मशाळातील विद्याथ्र्यांच्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा शिवाजी स्टेडयमवर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी दिव्यागं स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु. एन. नंदागवळी हे होते तर प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे सामाजिक कार्यकर्ता पवन वंजारी, समाज कल्याण अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे, वैसाका शिवशंकर खोब्रागडे, समाज कल्याण निरीक्षक शिवराम बारई, कनिष्ठ सहाय्यक निलेश गाढवे, विनोद उमप, नितीन मोहतुरे आदी मंचकावर उपस्थीत होते.
पुढे बोलतांना खा. पडोळे सांगीतले की दिव्यांगांच्या अशा स्पर्धेमुळे समाजात अपंगाबद्दलचे दृष्टीकोन तर बदलताच त्याच बरोबर सामजिक क्षेत्रात दिव्यांगाना समान संधीही मिळण्यास मदत मिळू शकते असेही त्यांनी यावेळी सांगीतले. तर अध्यक्षीय भाषणात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यू एन नंदागवळी यांनी मार्गदर्शन करतांना दिव्यांग विद्याथ्र्यांकरिता स्थानीक प्रशासन अधिक लक्ष देवुन कार्य करित आहे. दिव्यांगाना समाजाच्या प्रवाहात आणखी कसे सक्रिय करता येईल दृष्टीकोनातून जि. प. प्रशासन आश्र्वासित प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. कार्यक्रमा दरम्यान दिव्यांग क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन आकाशात बलून उडवून व हिरवी झेंडी दाखवुन स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे यांनी दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी दिव्यांग करीता राबविलेले योजनांची माहिती देत जिल्हातील दिव्यांग विद्याथ्र्यानी आतापर्यंत केलेल्या कामगीरी चे कौतुक केले.सूत्र संचालन रत्नाकर सहारे तर उपस्थितांचे आभार संजय माडवी यांनी मानले.