
मुंबई:- महाराष्ट्रात पालकमंत्री पदावरून वादंग निर्माण झाल्याचं दिसून येतंय. शनिवारी रात्री राज्यातील जिल्ह्यांसाठी पालकमंत्रिपदाची नावं सामोरे आली. पण या यादीतील दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला रविवारी स्थगिती देण्यात आली. हे दोन जिल्हे म्हणजे रायगड आणि नाशिक. रायगडमध्ये पालकमंत्रिपदासाठी आदिती तटकरे यांची वर्णी लागली होती. तर गिरीश महाजन यांचे नाव नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घोषित झाले होते. या नव्या वर्णीवर शिंदेंच्या आमदार, मंत्र्यांनी आक्षेप घेतला आणि हे दोन जिल्हे वेटिंगवर गेले. या मुद्यांवर आता विरोधी पक्षाने सरकारला टोले लगावले आहेत. एकनाथ शिंदेंची गरज संपल्यानं त्यांना बाजूला करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, आता नवा ‘उदयङ्क होईल असे भाकीत वडेट्टीवारांनी केलं. याला संजयराऊत यांनी दुजोरा दिला.