आ. डॉ. फुके यांच्या नेतृत्वात उबाठा गटाचा भाजपामध्ये प्रवेश
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस आज मोठे यश मिळाले. उबाठा गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवा नेते यांनी आज जाहीरपणे भाजपामध्ये प्रवेश केला. आज बेला भंडारा येथील हॉटेल फ्लेव्हर येथे भाजपा भव्य प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. हा प्रवेश डॉ. परिणय फुके यांच्या प्रभावी नेतृत्वात संपन्न झाला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे भाजपात नव्याने सहभागी होणाऱ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास दिसून आला. या प्रवेश सोहळ्यामुळे पक्षाच्या तालुका व जिल्हा पातळीवरील संघटनात्मक बळात मोठी भर पडली आहे. पक्षाचे विचार, कार्यपद्धती आणि नेतृत्व – विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचे पारदर्शक, विकासाभिमुख नेतृत्व व डॉ. परिणय फुके यांचे सक्रिय मार्गदर्शन यांवर दाखवलेला विश्वास नव्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
भाजपने मागील काही वर्षांत ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा, जलसंधारण, कृषी सुधारणा, महिला सक्षमीकरण व युवा संधी यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. हेच कार्य समाजातील अनेक घटकांना भाजपाशी जोडण्यास कारणीभूत ठरत आहे. या विशेष प्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री चैतु उमाळकर, जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते, माजी उपसभापती प्रशांत खोब्रागडे, तसेच इतर अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप हा फक्त निवडणुकांसाठीचा पक्ष नसून जनतेशी सतत जोडलेला, सेवाभावी विचारांचा पक्ष आहे, हेच या प्रवेशाने अधोरेखित झाले. या नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे भाजपाचा विस्तार अधिक प्रभावी होणार आहे, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला.