कारंजा येथे जुन्या वैमनस्यातून गावातील सावकाराची हत्या; ४ संशयित पोलिसांच्या ताब्यात…!
गोंदिया ग्रामीण पोलिसांनी या दिवस ढवळ्या झालेल्या घटने संदर्भात गावात विचारपूस केली असता मिळालेल्या माहितीनुसार कारंजा येथील राज गब्बर (३५), अजय कलाने (३३), गुलशन उईके (३०), कृष्ण सत्यवान मेश्राम(२२) सर्व राहणार कारंजा तालुका गोंदिया या ४ संशयित तरुणांना विचारपूस करिता ताब्यात घेण्यात आलेले आहे. गोंदिया ग्रामीण पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक हा गुंड प्रवृत्तीच्या होता आणि गावात सावकारी करत होता. मृतकाचा मुलगा पण गावात दारू विक्रीच्या व्यवसायात करत होता. गावात काही दिवसापूर्वी मृतक महेंद्र मदारकर चे गावातील काही प्रकरणाला घेऊन कारंजा गावातीलच तरुणांशी वाद झाला होता आणि त्यात महेंद्र मदारकर यांनी त्या तरुणांना पुढे बघून घेण्याची धमकी दिली होती.
अशातच आज सोमवारी महेंद्र मदारकर आपल्या घरा शेजारी वावरत असताना गावातील काही तरुणांनी त्याला घेरले दरम्यान आपला जीव वाचवण्याकरिता पडत सुटलेला महेंद्र भद्रुटोला या गावात घराचे बांधकाम सुरू असलेल्या एका कॉलमच्या खड्ड्यात धावतांनी पडला आणि तिथेच त्याच्या त्याचा पाठलाग करत असलेल्या तरुणांनी त्याला त्या कॉलमच्या खड्ड्यात तलवारीने भोसकून त्याची हत्या केली. गावात विचारपूस नंतर संशयाच्या आधारे सदर चार तरुणांना गोंदिया ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्या कडून या हत्येचा संदर्भात विचारपूस केली जात आहे. मृतक महेंद्र मदारकर यांच्या पुतण्या फिर्यादी रामप्रसाद लालचंद मदारकर (३१) रा. भद्रुटोला – कारंजा याच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी प्रकरण दाखल केले आहे. या हत्या प्रकरणाची पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर, गोंदिया ग्रामीण पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक येरणे करीत आहेत.