
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून आपल्या गावी दुचाकीने परत जात असणाऱ्या दुचाकीस्वारांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात एकाला अक्षरशः चिरडले गेले. तर, दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना साकोली राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी ४ वाजता घडली. अपघातानंतर ट्रक पसार झाला. मृताचे नाव सुभाष धनीराम भाजीपाले (४२) असे असून धनराज कापगते (५५) असे जखमीचे नाव आहे. हे दोघेही परसोडी गावातील रहिवासी आहेत. हे दोघेही शुक्रवारी दुपारी सुभाष भाजीपाले यांच्या मालकीच्या स्वतःच्या ट्रक असून परसोडी येथे घटनेच्या दिवशी ते आपल्या ट्रकमध्ये मका भरत होते व साकोली येथे ट्रक साठी टायर पाहायला आले होते मोटारसायकलने (एमएच ३६ / सी ४९०२) आले होते.
कामआटोपल्यावर गावी परतण्याआधी त्यांनी मोदी पेट्रोल पंप येथून पेट्रोल भरले. त्यानंतर ते गावी जाण्यासाठी निघाले असता मुंबईकोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील श्रीराम भात गिरणी समोर ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात सुभाष भाजीपाले जागीच ठार झाला. जखमी धनराज कापगते यांना नागरिकांनी आणि पोलिसांनी स्थानिक खासगी रुग्णालयात पोहोचविले. मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे पाठविण्यात आले.