पालांदूर येथे मनरेगा अंतर्गत नाल्यातील गाळ उपश्याच्या कामास प्रारंभ

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- येथील ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (महाराष्ट्र) अंतर्गत नेमीचंद खंडाईत यांच्या शेताजवळील गट क्रमांक ५८४/ १ या नाल्यातील गाळ काढणे या कामाचा रविवार (११मे) रोजी शुभारंभ करण्यात आला असून या कामावर एकूण ४८७ मजूर कार्यरत असल्याचे रोजगार सहायक आसाराम बावनथडे यांनी सांगितले. ह्या कामाच्या शुभारंभ स्थानिक पालांदूर येथील ग्रामपंचायतचे सरपंच लता कापसे, उपसरपंच पंकज रामटेके, ग्रामपंचायत सदस्य जिजा खंडाईत यांचेसह सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर सितारामजी कापसे, ग्रामस्थ धनराज देशमुख, लेखराम खंडाईत, नीलकंठ शेंडे, दौलतकापसे, अंताराम सेलोकर, ताराचंद्र मेश्राम, सुभाष पडोळे रोजगार सहाय्यक आसाराम बावनथडे व मजुरांच्या उपस्थितीत पार पडला.

या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम पाच लाख रुपये असून १०४० मजुरांनी कामाचे मागणी केली असली तरी प्रत्यक्षात ४८७ मजूर कामावर उपस्थित आहेत. उशिरा का होईना गावातच मजुरांना रोजगार उपलब्ध झाल्याने कामाच्या शोधात मजुरांची भटकंती तूर्तास थांबली आहे. नाल्यातील गाळ काढण्याच्या कामामुळे नाल्याची पाणी साठवण क्षमता वाढून शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी फायदा होणार असल्याचे सरपंच लता कापसे यांनी सांगितले. उपसरपंच पंकज रामटेके यांनीही मजुरांना रोजगार हमीच्या कामाबाबत विशेष मार्गदर्शन केले व मजुरी बाबत रूपरेषा समजावून सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *