नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणकरून “आमंत्रण लॉन’ चे बांधकाम

दै.लोकजन वृत्तसेवा तुमसर :- वर्षानुवर्षांपासून अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक नाल्यांवर शहरीकरण करतांना घाला घातला जात आहे. अनेक ठिकाणी नाल्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. पुर्वी वर्षभर पाण्याने वाहत असलेले नाले आता क़ोरडेठाक पडत असले तरी पावसाळ्यात सदर नाले तुडुंब भरुन वाहतात. परंतु, सदर नाल्यात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव घालुन नैसर्गिक नाला बुजवुन अतिक्रमण करुन स्वहित साधण्यासाठी चक्क तुमसर येथिल एका मोठ्या सुवर्ण व्यावसायीकाने नाल्यावर ‘आमंत्रण’ नामक लग्न समारंभाचा लॉनचे बांधकाम केल्याचा प्रकार तुमसर-भ़ंडारा राष्ट्रीय महामार्गालगत तुमसर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या बाजार समीती जवळील मांगली गावाच्या हद्दीत समोर आला आहे.परिणामी नालाच लुप्त करुन त्यावर बांधकाम करण्यात आले असल्याने नाल्यातील नैसर्गिक पाण्याचा मार्गच अरूंद झाला आहे. सदर नाल्याचे पाणी पावसाळ्यात नागरीकांच्या घरात व शेती पिकात शिराण्याचे प्रकार घडत आहेत.

तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील बाजार समिती जवळ नैसर्गिक नाला आहे. सदर नाल्यावर येथिल आमंत्रण लॉन सभागृह व्यावसायिकाने नाल्यावर अतीक्रमित बांधकाम करुन नाल्याचा आकार कमी केला असल्याने खुद्द लॉन सभागृह व्यावसायिकाने अतीक्रमणाला ‘आमंत्रण’ दिले आहे. सदर नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमणे सुरू असून भराव टाकून नाले बुजविण्यात येत आहेत. सभागृहाची आवार भिंत नाल्यातील पुराच्या पाण्याने वाहुन न जाण्यासाठी येथिल आमंत्रण लॉन सभागृह चालक व्यावसायिकाने भिंतीला सिमेंट काँक्रीटचे खांब (टेकु) लावले असल्याचे निदर्शनास येत आहे.सदर नाल्यावर पुल बांधला असुन या पुलावरुन वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वाढते अनधिकृत बांधकाम, अस्ताव्यस्त वाढलेल्या इमारती बा़ंधकाम, अनेक ठिकाणी नैसर्गिक नाले बुजवून करण्यात आलेले अतिक्रमण अशा अनेक समस्यांमुळे तुमसर शहरातील नागरिकांना पूरपरिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. कित्येक नागरीकांच्या शेतीचे, घराचे नुकसान होत आहेत.

मात्र याकडे ग्रा.प मांगली व न. प. तुमसरचे दुर्लक्ष होत आहे. येथिल ग्रा.प पदाधिकाऱ्यांना अद्याप जाग आलेली नाही. शहराबाहेरील नाले अरुंद असल्याने एका जोरादार पावसात तुमसर शहराला पुराच्या पाणी वेढा घालत असते. रस्त्यावरुन पाणी वाहत असते. परिणामीशहर जलमय होते. शहराबाहेरील व शहरातील नैसर्गिक नाले बुजूवुन अतिक्रमणे केल्याने पुराची समस्या निर्माण होते.याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह उद्योग क्षेत्राला बसत असतो. तुमसर शहराच्या सिमेला मांगली गावची हद्द लागुन असल्याने येथिल ग्रा.प हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असून नाले बुजवले जात आहेत. याकडे मात्र ल़ोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. सदर नाल्यांवर भराव टाकून लॉन, सभागृह चाळीचे बांधकाम करीत आहेत. तर काही भुमाफियांनी अतिक्रमणे करत नाले गिळंकृत करून भुंखंड विक्रीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद होत आहेत.

या नाल्यांची साफसफाई, स्वच्छता कधीच संबधित प्रशासनाकडुन केली जात नाही. पालिकेने व ग्रामपंचायतने पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी नाल्यांची स्वच्छता, रुंदीकरण करणे, व ईतर कामे विकसित करणे आदी कामे करणे गरजेचे असताना मात्र शहराच्या बाहेरच्या भागात असलेले नाले भूमाफिया व स़बधित लॉन सभागृह व्यावसायिक गिळंकृत करत आहेत. त्याचा फटका पुन्हा शहरातील नागरिकांना बसणार आहे. येथे प्रशासनावर कोणाचाही वचक आणि लक्ष नसल्याने भूमाफिया व लॉन सभागृह व्यावसायिक फायदा उठवून ही अतिक्रमणे करत आहेत. नैसर्गिक नाल्यांवर घाला घालुन नाले बुजूवुन बांधकाम करण्यात येणाऱ्या संबधित ग्रामपंचायत व नगर पालिका च्या हद्दीतील व्यावसायिकांच्या बांधकामाची व नैसर्गिक नाल्याचे सर्वैक्षण करुन चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी येथिल नागरिकांनी केली आहे.