महायुतीने भाजपला उमेदवारी दिल्यास तुमसर-मोहाडी विधानसभा निवडणुक लढणार

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. अशात कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळासोबतच सर्वसामान्य लोकांमध्ये देखील आहे. अशातच महायुतीने भाजप पक्षाला तुमसर -मोहाडी विधानसभा क्षेत्राची उमेदवारी दिल्यास महीला भाजपा आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी तुमसरमोहाडी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार तुमसर येथे आयोजित पत्रपरिषदेत केलाआहे. त्यासंबधी त्यांनी प्रचाराला सुद्धा सुरूवात केली आहे. विधानसभा निवडणूक २०२४ चा रणसंग्राम सुरु झाला आहे.

अशात महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या चर्चा सुरु आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. अशात आता अनेक पक्षातील नेत्यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. अनेकांनी तुमसर-मोहाडी विधानसभा निवडणूक लढण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला आहे. विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचा आणि महीलां कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने मी भाजप पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली आहे. पत्रपरिषदेत तुमसर तालुका अध्यक्षा सौ. प्रियंका कटरे, सौ. प्रिती बांगरे, सौ. अल्का देशमुख, सौ. पल्लवी पाटील, सौ. मेधा शुक्ला, सौ. मोरेश्वरी शरणागत, विद्या तट्टे उपस्थित होते.