
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- जागतिक ग्राहक दिवसाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा (पुरवठा विभाग) च्या वतीने तहसील कार्यालय मोहाडी येथे सोमवारी जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात युवक बिरादरी तर्फे पथनाट्य सादरीकरण करून मोहाडी तालुक्यातील राशन धारकांना मेरा ई केवायसी ॲप द्वारे मोबाईल वरून आता घरबसल्या इ के वाय सी करणे किती सोपे आहे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच राशन दुकानातून मिळणाऱ्या फोर्टिफाइड राईस चे आहारात व जीवनात कसे महत्त्व आहे हे पथनाट्याद्वारे सादरीकरण करून त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. सामान्य जनतेला व ग्राहकांना जागृत करून मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले. कार्यक्रमाला मोहाडी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सुखदेव चांदेवार, नायब तहसीलदार श्रीधर कारेमोरे, नायब तहसीलदार थोटे, निरीक्षण अधिकारी पल्लवी मोहाडीकर, कनिष्ठ लिपिक विनायक नंदनवार इत्यादी उपस्थित होते.