अब्बू आझमी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!
मंदिरे उद्ध्वस्त करणारा, हिंदू माताभगिनींवर अत्याचार करणारा, बळजबरीने धर्मांतर करणारा ! ते कार्यक्षम राज्यकर्ते नसून अतिरेकी आहेत अशा राज्यकर्त्यावर तात्काळ कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचे विधानसभेचे सदस्यत्वही रद्द करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन गोंदिया जिल्हा बजरंग दलाच्यावतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आले. निवेदन सुपूर्द करताना प्रांत समन्वयक नवीन जैन, जिल्हा सहसचिव सुनील कोहले, विभाग समन्वयक सुभाष पटले, जिल्हा समन्वयक अंकित कुलकणर्ी, सालेकसा ब्लॉक अध्यक्ष बद्री दशरिया, तिरोडा ब्लॉक मंत्री प्रदीप बिसेन, संघटना मंत्री श्रीकांत सावळे, दक्षिण पश्चिम ब्लॉक सह-सचिव बी. कोहळे, दक्षिण पश्चिम ब्लॉक सहसचिव बी हार्दिक जिवानी, साउथ वेस्ट ब्लॉक साप्ताहिक बबलू गभणे यांनी दिले. आमगाव :- आमगाव तालुका बजरंग दलाच्या वतीने तहसीलदारांमाफत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र राज्य ही वीरांची भूमी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी राजे हे आपले प्रेरणास्थान आहेत. या राज्यात राहून आपल्या देवतेचा अपमान करणारे अजिबात स्वीकारले जाऊ शकत नाहीत. आणि असाच एक देशद्रोही म्हणजे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझामी जे औरंगजेबाला एक सक्षम शासक आणि आपला आदर्श मानतो आणि औरंगजेबासारख्या निम्न दजाच्या शासकाला महान म्हणतो. धर्मवीर छत्रपती संभाजींवर ४२ दिवस अत्याचार करणारा शासक व मंदिरे उद्ध्वस्त केली. त्यांनी हिंदू माता आणि बहिणींवर अत्याचार केले.जबरदस्तीने धमातर तो एक कार्यक्षम शासक नव्हता तर एक दहशतवादी होता.
अशा राज्यकत्याचे कौतुक करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व तात्काळ रद्द करावे आणि त्यांना बजरंग दलाच्या स्वाधीन करावे.अशी मागणी आमगाव येथील बजरंग दलाने महाराष्ट्र सरकारला निवेदनातून विनंती सादर केली. निवेदन सादर करताना नवीन जैन, बालाराम व्यास, नरेंद्र वाजपेयी, यशवंत मानकर, प्रणव मेश्राम, घनश्याम अग्रवाल, राजू बावणथडे, गोपाळ शिवणकर, भैरव ढेकवार, कुणाल सोनवणे, राजेंद्र गौतम, राम सैनी, खोज कात्रे, समीर मानकर, मंथन कात्रे, रोशन बोर्डणे, ध्रुव महाराज, जगदीश डोमन इत्यादी उपस्थित होते.