३२ गावांचे पुनर्वसन तातडीने करावे; आम. नरेंद्र भोंडेकर यांची अधिवेशनात मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- भंडारा व पवनी या दोन्ही तालुक्यात दर वर्षी पुरामुळे लोकांची घरे बुडतात. यात ३२ गावांचे पुनर्वसना करिता प्रस्ताव पाठविला होता, ज्यातील २२ गावांचे प्रस्ताव आताही मंत्रालयात धूळ खात आहेत. मागील वर्षाच्या अधिवेशनात मुद्दा मांडून सुद्धा पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसल्याचे आम. नरेंद्र भोंडेकर हे आज मुंबई येथील पावसाळी अधिवेशन दरम्यान पॉईंट ऑफ इन्फर्मेशन अंतर्गत सदना समोर म्हणाले.

मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशन दरम्यान पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या कालावधीत आम. नरेंद्र भोंडेकर यांनी ३२ गावांच्या पुनर्वसनाचा मुद्दा घटला. ते म्हणाले कि, भंडारा विधान सभा क्षेत्रात ३२ गावे अशी आहेत ज्यात दार वर्षी पावसाळ्यात पाणी शिरतो. या गावांच्या पुनर्वसन करिता प्रस्ताव त्यास असून यातील २२ गावांचे प्रस्ताव मंत्रालयात पोहोचले आहेत.

याच मुद्यावर गेल्या अधिवेशनात लक्षवेधी च्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले असता मदत व पुनर्वसन मंत्री आशिष जायसवाल यांनी मिटिंग लावून प्रश्न तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन दिले होते. परंतु आजही प्रश्न मार्गी लागला नसल्याचे आम. भोंडेकर यांनी सांगितले. सोबतच गावकऱ्यांनी खामारी येथे आत्मदहनाचा इशारा दिला असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आणि विनंती केली कि कमी कमी आलेल्या २२ गावांच्या पुनर्वसनावर तातडीने निर्णय घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *