पावनी पोलीस स्टेशन नायक अजित वाहणे यांना लाच प्रकरणी
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- पुन्हा तडीपारीची कारवाई करण्यात येऊ नये यासाठी दहा हजार रुपयाची लाच घेण्याची तयारी दर्शवली यामुळे पवनी पोलीस स्टेशनचे पोलीस नायक अजित प्रल्हाद वाहने (वय ३७) रा. पवनी याला भंडारा लाच दुप्पट प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडून ताब्यात घेतल्या. सविस्तर असे की, तक्रारदार याच्या भावावर मुंबई पोलीस कायदा कलम ५६ अन्वये पवनी पोलीस ठाणे कडून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. त्याच्या हद्दपारीची मुदत दि. १३ जून ०२५ रोजी संपणार होती. दि. १० जून ०२५ रोजी पोलिस नायक अजित वाहने यांनी तक्रारदार यास पोलीस ठाणेस बोलावून, तक्रारदार याच्या भावावर पुन्हा तडीपारीची कारवाई किंवा अन्य कसलीही प्रतिबंधक कारवाई करायची नसेल तर त्याच्या स्वतः करिता १०,०००/- रुपये लाचेची मागणी केली आहे अशी तक्रार दि. १२ जून ०२५ रोजी तक्रारदार यांनी ला. प्र. वि भंडारा येथे दिली.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. १३ जून ०२५ ते १४ जून ०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान पंचा समक्ष आलोसे यांनी १०,०००/- रुपये लाच रक्कम स्वतः साठी स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. दि. १६ जून ०२५ व दि. १७ जून ०२५ रोजी पवनी पोलीस ठाणे येथे शासकीय पंच यांचे सह तक्रारदाराकडून लाच स्वीकृती कारवाईचे नियोजन केले असता आलोसेयास तक्रारदार यांचा संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. आलोसे पोलीस नाईक अजित वाहने यास ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन पवनी, जिल्हा भंडारा येथे सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.