राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जिल्हा ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष पदी सचिन बडवाईक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे जिल्हाध्यक्ष चरणजी वाघमारे यांच्या नेतृत्वात तुमसर येथील सचिन घनश्याम बडवाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जिल्हा ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती सूर्यकांत (आप्पा) गवळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अध्यक्ष, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती, महाराष्ट्र प्रदेश यांच्या नियुक्ती पत्र क्रमांक महा/७०/२५, दि. १६ जून ०२५ अनव्ये करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील संघटनात्मक कामाला प्रथम प्राधान्य देवून व जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरीत्या करून व पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वशक्तीनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून पक्षाची ध्येय धोरणे व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार जनते पर्यंत पोहोचण्यासाठी काम करू असे बडवाईक यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *