धानाची लिमिट नसल्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदी बंद- खा.डॉ.प्रशांत पडोळे
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- लिमिट नसल्यामुळे जिल्यातील धान खरेदी बंद आहे. दि. ३० जून २०२५ खरेदीची शेवटची तारीख असून २० % खरेदी झाली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ८०% धान हे केंद्रावर नेऊन ठेवले असून पण त्यांची लिमिट व बारदाना अभावी खतवणी झाली नाही. यामुळे जिल्ह्यातील बरेच शेतकरी खरेदी पासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरती जिल्ह्यातील सत्ताधारी नेते मुंग गिळून बसले दिसत आहेत काँग्रेसचे सरकार असताना आ.परीणय फुकेंनी डिओमो च्या कार्यालयाला ताला ठोको आंदोलन केले होते आणि आपला मोर्चा कलेक्टर ऑफिस कडे वळवला होता आणि आता हेच सत्ताधारी पक्षाचे नेते बोनस च्या श्रेयवादाची लढाई लढत आहेत. शेतकऱ्यांच्या धान मोजणीसाठी काहीच बोलत नाही. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर सत्ताधारी पक्ष भाजप खूप मोठा अन्याय करत आहे. हे दिसून येत आहे. असे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी सांगितले.