भंडारा नगरीत १९ ते २६ मार्चपर्यंत श्रीराम जन्मोत्सव व शोभायात्रेचे आयोजन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीराम शोभायात्रा समिती तर्फे भंडारा नगरात दि. १९ ते २६ मार्च २०२६ पर्यंत श्रीराम जन्मोत्सव व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी या कार्यक्रमांत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम शोभायात्रा समिती भंडाराच्यावतीने आज दि. १७ मार्च रोजी विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेतून करण्यात आली.

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ मार्च २०२६ सकाळी ७ वाजता रोजी हिंदु नववर्षानिमित्त धर्मध्वजा व गुढीरोहण बहिरंगेश्वर मंदिर परिसर, गांधी चौक व राजीव गांधी चौकात करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम व ढोलताशापथकाचा कार्यक्रमराजीव गांधी चौकात होणार आहे. दि. २० मार्च रोजी सकाळी ७ वाजता गांधी चौकात सामुहिक श्रीरामरक्षा स्त्रोत, श्री हनुमानचालिसा पाठ होणार आहे. दि. २१ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता बहिरंगेश्वर मंदिरात स्थानिक कलाकारांचे श्रीराम स्तुती भजन संध्या, दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता असर फाऊंडेशनच्यावतीने बहिरंगेश्वर मंदिर परिसरात श्रीराम जिवन चरित्रावर नाटक,

दि. २३ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता बहिरंगेश्वर मंदिर परिसरात श्री खाटुश्याम भजन संध्या, दि. २४ मार्च रोजी रात्री ८ वाजता श्रीराम मित्र मंडळाच्यावतीने सुंदरकांड, दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुरभी सचिन ढोमणे व ग्रुप यांच्यावतीने श्रीराम भजन संध्या सुरसंगम व दि. २६ मार्च रोजी सकाळी ८ वाजता शितला माता मंदिरपासून श्रीराम बाईक रॅली निघणार आहे. सकाळी १० वाजता गणेशबुवा चेपे यांचे श्रीराम जन्माचे किर्तन, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव व सायंकाळी ५ वाजता श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा निघणार आहे. ही शोभायात्रा बहिरंगेश्वर मंदिर, डॉ. हेडगेवार चौक, जलाराम चौक, गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक, लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक, शितला माता मंदिर मार्गे निघून परत बहिरंगेश्वर मंदिर परीसरात येणार आहे. हिंदु नववर्षा निमित्त प्रत्येकांनी आपापल्या घरी गुढी उभारून भगवा ध्वजा लावावा, असेही आवाहन करण्यात आले.पत्रकार परिषदेत श्रीराम शोभायात्रा समितीचे अध्यक्ष तुषार काळबांधे, सचिव मंगेश वंजारी, उपाध्यक्ष सुरेश धुर्वे, अजित आस्वले, संयोजक धनंजय ढगे, प्रकाश पांडे, दिपा नायर, साधना त्रिवेदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *