आयुध निर्माणी कंपनीत स्फोट; ८ ठार, ०५ च्यावर जखमी

आयुध निर्माण कारखान्यातील या स्फोटाने नागरीक भेदरून गेले. या स्फोटाचे कारण काय आहे हे समोर आलेले नाही. या घटनेचे गांभीर्य पाहता आयुध निर्माणी जनरल मॅनेजर शप्रे, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, स्थानिक प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि आपत्ती व्यवस्थापनात कार्यरत कर्मचारी यांच्यासह एस. डी. आर. एफ आणि एन.डी.आर एफ. च्या चमू घटनास्थळी दाखल झाल्या.
दिवसभर घटनास्थळावर अग्निशमन पथक, पोलीस विभाग, तहसीलदार व इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांनी बचाव कार्य सुरू केले. बचाव कार्यादरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी देखील भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची माहिती घेऊन बचाव कार्य युद्ध पातळीवर राबवण्याचे निर्देश दिले. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन घटनास्थळी पूर्ण वेळ उपस्थित होते. आतापर्यंत घेतलेल्या माहितीनुसार अद्यापही बचाव कार्य सुरू असल्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी सांगितले. नगर परिषद भंडारा, सनफ्लॅग कंपनी वरठी यांचे अग्नीशमन वाहन घटनास्थळी पुरविण्यात आले आहे. आयुध निर्माणी भंडारा यांचे स्वतःचे अग्नीशमन वाहन देखील घटनास्थळी कार्यरत आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका पुरविण्यात आल्या असून जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी व्यक्तींवर उपचाराकरीता बेड राखीव ठेवण्यात आलेले आहेत.