ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीचे थाटात उद्घाटन
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :-महाराष्टड्ढ राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्टड्ढ राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने भंडारा ग्रंथोत्सव-२०२४ चे आयोजन २१ व २२ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले. त्यानिमित्ताने आज २१ जानेवारी, रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय स्टेशन रोड शास्त्री चौक भंडारा येथे सकाळी ९.०० वाजता ग्रंथपूजन करुन ग्रंथदिंडीचे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलिस अधिक्षक नूरुल हसन, पद्मश्री पुरस्कार प्राप्त साहित्यीक परशुरामकर खुणे यांच्या हस्ते विधीवत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ग्रंथालय संचालक मुंबई अशोक गाडेकर, सहायक ग्रंथालय संचालक नागपूर रामदास साठे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, खुपेंद्र बोपचे मुख्य लिपिक, सग्रसं छत्रपती संभाजी नगर, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रारंभी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ते गांधी चौक पङ्र्मंत ग्रंथ qदडी काढण्ङ्मात आली. महात्मा गांधीजी पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर शालेय विद्याथ्र्यांच्या लेझिमच्या तालात ग्रंथदिंडी ही गांधी चौक येथून शास्त्री चौकातील जिल्हा ग्रंथालङ्मात नेण्ङ्मात आली. ङ्मा ग्रंथ qदडीत भंडारा शहरातील नागरिकांचा तसेच शालेय विद्याथ्र्यांचा उत्स्फुर्त सहभाग होता.