पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते “अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत आमगाव रेल्वे स्थानकाचे लोकार्पण
या लोकार्पण कार्यक्रमात देशातील १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील १०३ स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. आमगाव येथे विशेष लोकार्पण सोहळ्याला माजी आमदार भेरसिंग नागपुरे, आमदार प्रतिनिधी त्यांच्या पत्नी सविता संजय पुराम, घनश्याम अग्रवाल, जिल्हा परिषद सदस्य छबुताई, दक्षिण मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आमगाव तालुक्यातील भाजप चे पदाधिकारी तसेच स्थानिक गणमान्य नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ङ्गरेल्वेच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात विकास पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. तसेच देशातील प्रत्येक गरीब अथवा श्रीमंत नागरिकाला आधुनिक सुविधा लाभ मिळणे हे आमचे लक्ष्य आहे. देशातील प्रत्येक भागातील स्थानकांचे आधुनिकीकरण हे केवळ पायाभूत सुविधांचे उन्नयन नसून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे पाऊल आहे असे सांगितले.
आमगाव स्थानकाचे आधुनिकीकरण”अमृत भारत स्टेशन योजना’अंतर्गत करण्यात आले असून, त्यामध्ये प्रवाशांसाठी पार्किंग व सक्यर्ुलेशन क्षेत्राचा विस्तार, विशेषतः सणउत्सव व गर्दीच्या वेळी उपयोगी, उंच मास्ट लाइट्स – उत्तम प्रकाश व्यवस्था व सुरक्षा, बाह्य स्वरूपाचे उन्नतीकरण – (दुसऱ्या टप्प्यात) – भित्तीचित्रे व सजावट, फ्लॅग माउंट व सजावटी ध्वज – राष्ट्रीय गौरवाचे प्रतीक, बारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाढवलेली सुरक्षा व्यवस्था, “वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजना – स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन या सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधा “अमृत भारत स्टेशन योजना’ च्या माध्यमातून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या उपक्रमामुळे आमगाव स्थानकाचा कायापालट होऊन प्रवाशांना सुसज्ज व सुरक्षित प्रवास अनुभवता येणार आहे.