
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा तालुक्यातील पहेला परिसरात अवकाळी पाऊस व वादळामुळे धान पिके व राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतुक ठप्प पडली होती. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने असून ते संकटात सापडले आहेत. तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले यांनी केली आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बी हंगामात निघावे यासाठी मोठ्या आशेने उन्हाळी धान पिकांची लागवड केली होती. मात्र आज दि. २० मे रोजी दुपारी ३ वाजताच्या विजेचाकडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला.
यामुळे भंडारा तालुक्यातील पहेला परीसरात मोठ्या प्रमाणात वादळी पावसाने हजेरी लावली. परिणामी हजारो हेक्टर शेतातील उभे उन्हाळी धान पीक जमीनदोस्त झाले. धान पिकासाह आंबा व भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरांचे पत्रे उडाले. भंडारा-पवनी रस्त्यावर झाडे तुटून पडल्याने वाहतुक ठप्प पडली होती. जेसीबीने झाडे बाजुला सरकविल्या नंतर वाहतूक पुर्ववत सुरु झाली. दोन्ही बाजूलावाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीज प्रवाह खंडित झाला.