भर दुपारी दुचाकीच्या डिक्कीतून १ लाख ४० हजार चोरून नेले
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- फिक्स डिपॉजीट केलेली १ लाख ४० हजाराची रक्कम बँकेतून काढून मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवली. खाली पडलेले पैसे उचलण्याकरीता मोटारसायकल थांबवली असता अज्ञात दोघांनी डिक्कीतून १ लाख ४० हजार रुपये चोरून नेल्याची घटना भंडारा येथे दि. २१ मे रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक आत्माराम ब्राम्हणकर (६५) रा. ग्राम सेवा काँलनी खोकरला युनियन बँक शाखा राजीव गांधी चौक भंडारा येथे फिक्स डिपाँजीट केलेली रक्कम विड्राँल करण्याकरीता आले होते. बँकेच्या कॅश काऊंटनवरून त्यांनी १ लाख ४० हजार रुपये विड्राल करून पिवळ्या रंगाच्या पिशवीत ठेवली व ती पिशवी मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवली. महीला नागरी सहकारी पथ संस्था मर्या भंडारा येथे कर्जाची रक्कम भरण्याकरीता राजीव गांधी चौक भंडारा येथुन मोटर सायकलने जात असतांना डाँ झाकीर हुसैन उदर्ु प्राथमीक शाळा भंडाराच्या समोर फिर्यादीच्या मागेहुन काळ्या रंगाचा युनीकाँन मोटार सायकलचा चालक पाढऱ्या रंगाचा फुल बायाचा शर्ट व काळ्या रंगाचा पँट घातलेला व चेहऱ्याला रुमाल बांधलेला वय अंदाजे ३५ वर्ष तसेच मागे बसलेला इसम काळ्या रंगाची टिशर्ट व काळ्या रंगाचा पँन्ट घातलेला वय ३० वर्ष इसम आले. त्यांनी फिर्यादीला काका तुमचे पैसे खाली पडले आहेत असे बोलुन ते दोन इसम पुढे काही अंतरावर थांबले.
फिर्यादीने मोटार सायकल थाबंवुन मागे वळुन पाहीले असता डांबरी रोडवर ५० रुपयाचे ३ नोटा व २० रुपयाच्या २ नोटा पडलेल्या दिसल्या. फिर्यादी मोटार सायकल बाजुला लावुन रोडवर पडलेले पैसे उचलण्यासाठी जात असतांनी काळ्या रंगाच्या टि शर्ट घातलेल्या आरोपीने फिर्यादीच्या मोटार सायकलच्या डिक्कीमधुन पिशवीत ठेवलेले १ लाख ४० हजार रुपयाची रक्कम चोरून मोटरसायकलने गांधी चौकाच्या दिशेने निघाले. फिर्यादीने आरोपीतांचा पाठलाग केला असता दोन्ही आरोपी मोटार सायकलने गांधी चौकच्या दिशेने पळुन गेले. तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तपास पोलीस उपनिरीक्षक फरताडे करीत आहेत.