स्व. राजीव गांधी स्मृतीदिनी काँग्रेसतर्फे भारतीय सेनेचे कौतुकास्तव तिरंगा बाईक रॅली

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे दि. २१ मे ला भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज “जरा याद करो कुर्बानी’ या प्रेरणादायी संकल्पनेतून “तिरंगा बाईक रैली’ चे आयोजन करण्यात आले. “जरा याद करो कुर्बानी’ – ही फक्त घोषणा नाही, ती आपल्या वीर शहीदांच्या बलिदानाची आठवण आहे. आज भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी, “ऑपरेशन सिंदूर’ मध्ये शौर्य गाजवलेल्या जवानांना अभिवादन करण्यासाठी ही “तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. भंडारा शहरातून निघालेली ही रैली राजीव गांधी चौक येथे स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून खांबतलाव चौक, खात रोड, शास्त्री चौक, गांधी चोक, त्रिमूर्ती चौक, मुस्लिम लायब्ररी चौक ते समारोप राजीव गांधी चौक येथे करण्यात आला.

यावेळी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी दाखवलेल्या अद्वितीय शौर्याला सलाम आणि अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात बलिदान दिलेल्या स्मृतीप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ही रैली काढण्यात आली असे मोहन पंचभाई यांनी सांगितले. व यावेळी बोलताना जिया पटेल म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर’ राबवून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या भारतीय सैनिकांचा आम्हाला फार अभिमान आहे. तसेच महिला जिल्हाध्यक्ष जयश्री ताई बोरकर यांनी सांगितले की भारता कडे जे कोणी वाईट नजरेनी बघतील त्यांना असंच सहन करावे लागणार आहे. आमच्या सैन्य मुळे आम्ही सर्व सुरक्षित आहोत आणी आम्हाला आमच्या सैन्यावर विश्वास आहे. सैनिकांच्या विजयाचे कौतुक करण्याकरीता तसेच युद्धात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना मानवंदना देण्यासाठी आज ही रैली काढण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके, प्रदेश महासचिव जिया पटेल, सफी भाई लदानि, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, इंटकचे जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे, वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ गायधने, धनंजय तिरपुडे, तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, राजेश हटवार, योगेश झलके, राजू भाऊ निर्वान, शंकर राऊत, गजानन झंजाड, बालू ठवकर, शमिम शेख, पृथ्वी तांडेकर, किशोर राऊत, विनीत देशपांडे, पंकज उके, योगेश गायधने, इमराण पटेल, नरेंद्र साकुरे, कमल साठवणे, मनोज बागडे, स्वाती वाघाये, गायत्री वाघमारे, अनिता भुरे, पूजा हजारे, मार्तंड भेंडारकर, प्रेम वनवे, राजकपूर राऊत, सुरेश राऊत, आशिष निखाडे, लालचंद लोथे, सुरज डोंगरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *