कारवाईच्या भितीने रस्त्यावरच रेती रिकामी करून पाच टिप्पर फरार

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी : आज सकाळी सहा वाजता मोहाडी बायपास रस्त्यावर अवैध रेती वाहतुक करणाऱ्या सहा पैकी पाच टिप्पर चालकांनी कारवाईच्या भिती पोटी रस्त्यावरच रेती रिकामी करून धुम ठोकली परंतु एक टिप्पर महसुल पथकाच्या हाथी लागला. या वेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा खणीकर्म अधिकारी भंडारा यांनी घटनास्थळी भेट दिली. तुमसर कडून भंडारानागपूर कडे मोठ्या प्रमाणात विनापरवाना रेती वाहतूक सुरु आहे. अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी मोहाडी येथील महसूल पथक गस्तीवर असताना त्यांना काही टिप्पर येताना दिसले असता त्यांनी एका टिप्परला थांबविले असता त्यामागे असलेले पाच टिप्परच्या चालकांनी रस्त्यावरच रेती रिकामी केली.

रेती रिकामी करीत असताना विद्युत तारांना टिप्परच्या ट्रॉलीचा स्पर्श झाल्याने विद्युत ताराही तुटल्या. टिप्पर क्र. एम.एच. ४०/ सी.टी. ९२३८ वर कारवाई करून तहसील कार्यालय मोहाडी येथे जमा करण्यात आला. तसेच रस्त्यावर पडलेली पुर्ण रेती बेटाळा रेती डेपोवर पाठविण्यात आली.सदर कारवाही मंडळ अधिकारी एस. एन. हलमारे, मंडळ अधिकारी एम. डी. ईप्पर, मंडळ अधिकारी जगदीश कुंभारे, हिमांशू साखरे, ग्राम महसूल अधिकारी कार्तिक सिरसकर, ग्राम महसूल अधिकारी रविंद्र साळुंखे, ग्राम महसूल अधिकारी विकास कदम यांचेद्वारे करण्यात आली. तसेच मौक्यावरून पळून गेलेल्या पाच टिप्पर वर मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *