वादळी वाऱ्यासह पाऊस, लाईट गेली अन् उड्डाण पुलावरही पाणी
तर, मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा इथं उड्डाण पुलावर पाणी साचलंइथून जाणारे खासदार प्रशांत पडोळे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तिथं थांबून प्रशासनाच्याभोंगळ कारभाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला.पहिल्याचं अवकाळी पावसात राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावरील परिस्थिती दाखवणारा हा त्यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.या अवकाळी पावसानं उन्हाळी भात पिकाला संजीवनी मिळणार आहे. मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या घरात पोहचलंय. “अवकाळी पावसात भिलेवाडा गावाजवळील पुलावर प्रचंड प्रमाणात पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. पुलावरील कामात गंभीर त्रुटी असल्याचे यावरून स्पष्ट दिसते. या निकृष्ट दर्जाच्या कामावर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी संताप व्यक्त करत ठेकेदारांवर आणि प्रशासकीय दुर्लक्षावर सडकून टीका केली.