सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांकडून शासकीय नियमाची पायमल्ली

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- शासनाने विशिष्ट नागरी सेवा व सुविधा या निधी अंतर्गत तुमसर शहरातील विविध विकास कामासाठी पंधरा कोटी रुपयांचा दि. १४ मार्च २०२४ रोजी निधी मंजूर केलेला होता परंतु कामे प्रस्तावित करताना अनेक कामांचे तुकडे करण्यात आले व झालेल्या कामे सुद्धा प्रस्तावित करण्यात आले विशेष म्हणजे सदर कामे नागरी सेवा सुविधांची असल्यामुळे नगर विकास चे नियम या कामांना लागू होतात त्यानुसार सर्व कामांसाठी खुल्या पद्धतीने ही निविदा करणे आवश्यक होते. परंतु सदर सर्व कामे मॅनेज करण्याच्या हेतूने प्रथमतः जीआर मध्ये व जिल्हाधिकारी यांनीदिलेल्या प्रशासकीय मंजुरी मध्ये सदर सर्व कामे तीस लाखाच्या वर असल्यानंतरही या कामांना तीस लाखाच्या आत दाखवून फक्त जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनाच हे काम देता येईल व सर्व सुशिक्षित बेरोजगारांची डिएससी एका ठिकाणी जमा करून निविदेमध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा केलेला आहे.

नियमबाह्यरित्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर निविदा ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रकाशित केली. विशेष म्हणजे या सर्व कामासाठी जवळपास ३० कामांची निविदा प्रकाशित करण्यात आली व सर्व कामांसाठी विशिष्ट सुशिक्षित बेरोजगारांना भाग घेता येईल या पद्धतीने नियोजन करून एका विशिष्ट ठिकाणाहून सर्व निविदा भरण्यात आली व या सर्व निविदा भरण्यासाठी वापरण्यात आलेल्या संगणकाचेआयपी? ड्रेस तपास केल्यास जवळपास एकाच ठिकाणचे असल्याचे दिसून येईल. या सर्व कामांमध्ये ठरलेल्या लोकांनाच कंत्राट देण्यात आले असून इतर लोकांनी भरण्याचा प्रयत्न केलेल्यांना त्यांचे अतिशय शुल्लक कारणाने निविदा नाकारण्यात आलेली आहे.

या निवेद्य घोटाळे मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागा भंडाराचे वरिष्ठ अधिकाऱ्यापासून तर खालच्या अभियंता पर्यंत सामील असून त्यांनी संगणमत करून स्पर्धा न करता विशिष्ट लोकांना निविदा मिळावी या हेतूने कटकारस्थान केलेला आहे. त्यामुळे याची सखोल सायबर गुन्हेशाखेकडून तपासणी करून संबंधितांवर कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्याची मागणी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख अमित एच. मेश्राम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *