विद्यार्थ्यांनी सांभाळली एक दिवस ग्रामपंचायत
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- आज दि. २४ एप्रिल २०२५ ला राष्ट्रीय पंचायतराज दिवसआचे औचित साधून ग्रामपंचायत बेला येथील आजचा संपूर्ण कारभार जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांभाळाला. विशेष म्हणजे ग्रामसभा सुद्धा त्यांनी घेतली. सरपंच शारदा गायधने, उपसरपंच अर्चना कांबळे व ग्राम विकास अधिकारी विलास खोब्रागडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय पंचायत राज दिवस आजच्या दिवशी संपूर्ण देशभर रबविण्यात येतो. यावर्षीचा राष्ट्रीय कार्यक्रम बिहार येथे आयोजित करण्यात आला. यासोबत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत २२ एप्रिल वसुंधरा दिवस ते १ मे महाराष्ट्र दिन पर्यंत “पर्यावरण बचाओ, वसुंधरा सजाओ’ या ब्रीद वाक्यानुसार कार्यक्रम सुद्धा रबविण्यात आला या करिता मुख्य कार्यकारी अधिकारी, मिलिंदकुमार साळवे ( भा. प्र. से.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उमेश नंदागवळी, गट विकास अधिकारी, डॉ. संघमित्रा कोल्हे, विस्तार अधिकारी, प्रमोद हुमणे, प्रमोद तिडके, विवेक भगत, यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना इसरो ची हवाई सफर करण्याची घोषणा सुद्धा सरपंच शारदा गायधने यांनी केली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदयसगण सर्वश्री धनराज गाढवे, विनोद नागपुरे, अर्चना पंचबुद्धे, रजनीताई बाभरे, बबिता चवरे, सुप्रिया शेंडे, मनीषा इंगळे, वंदना कुथे, राकेश मते, श्रीकृष्ण वैद्य, स्नेहल मेश्राम, सोपान अजबले, पोलीस पाटील, भिवंगडे, तंटामुक्ती अध्यक्ष नागपुरे, जि. प. शाळा, सावित्रीबाई फुले विद्यालय, महेंद्र कनिष्ठ महाविद्यालय, रॉयल पब्लिक स्कूल, सेंट पीटर स्कूल, आवसिस स्कूल, ई. शाळेचे शिक्षक वृंद, बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, उमेद च्या कार्यकर्ते व सर्व गावकरी यांनी सहकार्य केले.