किसनपुर फिडरवरील इमरजन्सी लोडशेडींग बंद करा
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- करडी सब डीव्हीजनवरून आलेली किसनपुर येथील विजपुरवठा एमरजन्सी लोडशेडींग बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा २६ एप्रिल पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा जांभोरा येथील शेतकऱ्यांनी करडी वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सविस्तर असे की, जांभोरा किसनपुर परीसरातील शेतकऱ्यांनी १२ तास कृषी पंपाला विज द्या यासाठी शेतकऱ्यांनी करडी सब डिव्हीजन कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांची समस्या विज वितरण विभाग कडून लक्षात घेवून १२ तास विज पुरवठा देण्याचे घोषणा केली होती. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.एक महीणा लोटत नाही तर पुन्हा विज वितरण विभाग कडून कृषी पंपा करीता १२ च्या ऐवजी ८ तास विज पुरवठा देणे सुरू केले असून विज वितरण विभाग कडून शेतकऱ्यांना केराची टोपली दाखवली आहे.
एमरजन्सी लोडशेडींग केली जात असल्यामुळे धानाला बरोबर पाणी मिळत नसल्याने धान वाळू लागलेले आहे. आत धान फुलोऱ्यावर असतांना अशावेळी पाणी मिळत नसेल तर धानाचे काय हाल होईल. लोंब करपु लागले आहे.हातात आलेला धान जावू लागल्याने शेतकरी तळपु लागले आहे. दोन दिवसांत एमरजन्सी लोडशेडींग बंद करण्यात आले नाही तर जांभोरा येथे २६ एप्रिल २०२५ रोजी हनुमान मंदीरा समोर आमरण उपोषण करण्यात येइल या संबंधी करडी विज वितरण विभाग चे शाखा अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. आम. राजु भाऊ कारेमोरे, तहसिलदार मैडम, करडी पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले असल्याचे उपसरपंच यादोराव मुंगमोडे यांनी सांगितले आहे.