घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्या

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वर्तमान स्थितीत रेतीचे वाधारलेली दरे कमी करून घरकुल धारकांना कमी दरात रेती उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. संपूर्ण जिल्ह्यात घरकुल योजनेची घरे मंजूर करण्यात आली आहे. घरकुल योजनेची कामे सुरू असतांना रेतीचा तुटवडा सुरू आहे. शासन द्वारे सुरू करण्यात आलेल्या रेती डेपोवर नियोजित दर पेक्षा अधिक दरे घेण्यात येत आहे. त्यामुळे गरिबांना मिळणाऱ्या घरकुलांची कामे रडखडली गेली आहे. रेतीची वधारलेली दरे कमी करून घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांला रेती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.