जिथं जरागेंनी मराठा आंदोलन उभं केलं तिथंच ओबीसी नेता वरचढ, अंतरवालीत महादेव जानकरांना लीड!

मुंबई:- यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान संपूर्ण देशाचे महाराष्ट्रावर लक्ष होते. महाराष्ट्रात नेमकं कोण बाजी मारणार याची सर्वांंनाच उत्सुकता होती. गेल्या दोन ते तीन वर्षांंत बदलेली राजकीय परिस्थिती, शिवसेना आणि राष्ट्रवादी यासारख्या महत्त्वाच्या पक्षांची झालेली शकलं आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाला मिळालेली हवा यामुळे यावेळी निवडणुकीचे सगळे गणित बदलले होते. दरम्यान, मराठा आरक्षणाचा या निवडणुकीवर मोठा परिणाम पडणार, असं सांगितलं जात होतं. त्याचा परिणाम प्रत्यक्षात दिसलादेखील. सत्ताधारी महायुतीला या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसला. पणज्या ठिकाणी हे मराठा आरक्षण उभं राहिलं, जे ठिकाण मराठा आरक्षणाच्या लढ्याचं केंद्र ठरलं, त्याच अंतरवाली सराटीत मात्र ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या उमेदवाराला पसंती मिळाली आहे.