राहुल गांधींवरील एफ. आय. आर. विरोधात भंडारा काँग्रेस आक्रमक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात उत्तराखंडमध्ये दाखल करण्यात आलेल्या द्वेषपूर्ण एफ.आय.आर. च्या निषेधार्थ भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करत निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आयोजित या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत भाजप सरकारच्या दडपशाही राजकारणाचा निषेध केला. ‘सत्य बोलणाऱ्या आवाजाला एफ.आय.आर. ची भीती दाखवून गप्प करता येणार नाही. अन्याय करणाऱ्यांना अभय आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांवर एफ.आय.आर. हा कोणता न्याय’ असा सवाल यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला. हल्द्वानी येथील सामाजिकदृष्ट्या निंदनीय घटनेविरुद्ध आवाज उठविल्याबद्दल राहुल गांधींवर एफ.आय.आर. दाखल करणे म्हणजे दोषींना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात राहुल गांधींवरील एफ.आय.आर. तात्काळ मागे घ्यावी, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी प्यारेलाल वाघमारे, धनराज साठवणे, गणेश बाणेवार, मंगेश वंजारी, कुंडलिक मोटघरे, राहुल राऊत, नाहिद खान, राजेश मेश्राम, धनंजय देशकर, अमरदीप नागपुरे, विष्णू बोरकर, संदेश श्यामकुवर, संघदीप डोंगरे, गणेश लिमजे, भावेश नागपुरे, बालू ठवकर, दिलीप मडाμε, गंगेश्वर मोहरकर, अक्षय साठवणे, संजय बांते, रवी तिरपुडे, पुरुषोत्तम गायधने, राधेश्याम शेंडे, जयेंद्र देवगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *