भंडारा येथील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात दोषारोप पत्र न्यायालयात सादर

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- पोलीस स्टेशन भंडारा येथे अल्पवयीन पिडीता संदर्भात दिनांक ०६ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी रोहीत संजय वासनिक, वय ३० वर्षे, रा. समता नगर, फेज-२ भंडारा याचे विरुद्ध अप.क्र. १६९९/ २०२६ कलम ६४, ६४ (२) (आय), ६५ (२), ९९ (२), १२६ (२) भा.न्या.सं. सहकलम ४, ६ पोक्सो अन्वये दाखल झालेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास अत्यंत संवेदनशीलता, दक्षता व व्यावसायिक दृष्टिकोनातून करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करताना केवळ प्रत्यक्ष माहिती अथवा जबाबांवर अवलंबून न राहता घटनास्थळावरील सविस्तर पुरावे हस्तगत करून परिस्थिती, उपलब्ध भौतिक पुरावे, वैद्यकीय निष्कर्ष, इलेक्ट्रॉनिक पुरावे, वैज्ञानिक तपासातून प्राप्त निष्कर्षामानुसार दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर

२४ दिवसांत ५७६ पानी दोषारोपपत्र
सदर गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या २४ दिवसांच्या कालावधीत एकूण ५७६ पानी दोषारोपपत्र विशेष सत्र न्यायालय भंडारा येथे सादर करण्यात आले आहे. ही कार्यवाही गंभीर गुन्ह्याच्या तपासामध्ये वेग, अचूकता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कायदेशीर प्रक्रिया यांचा समन्वय साधण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

जलदगतीने सुनावणी बाबत पत्रव्यवहार
प्रकरणाचे गांभीर्य व अल्पवयीन बालकेशी संबंधित प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी शक्य तितक्या जलदगतीने व प्रभावीपणे पूर्ण व्हावी, यासाठी न्यायालयास पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच प्रभावी न्यायालयीन कामकाजासाठी विशेष अभियोक्ताची नियुक्ती करण्याबाबत शासन प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

आरोपी न्यायालयीन कोठडीत
आरोपी रोहीत संजय वासनिक यास कायदेशीर प्रक्रियानुसार अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे.

पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकातील तपास अधिकारी श्रीमती ज्योतीका इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पोलीस निरीक्षक सुरेन्द्र राऊत सह ३ सपोनी/पोउपनि व ६ अंमलदार असे तपास पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *