परिवर्तन शिक्षण संस्थेला सामाजिक न्याय विभागाचा पुरस्कार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- परिवर्तन शिक्षण संस्था वासेळा या संस्थेला नुकताच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे. परिवर्तन शिक्षण संस्था वासेळा यांचे सचिव संजय पुंडलिक घोडके तसेच अध्यक्षा सविता संजय घोडके यांना पुरस्काराचे स्वरूप ७.५० लाख सन्मानपत्र, मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण १३० पुरस्कारार्थ्यांची निवड या पुरस्काराकरिता करण्यात आलेली आहे. त्यामध्ये ९० व्यक्ती व ४० संस्थांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण दि. १० जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले.

या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक नागपुर महसूली विभाग क्षेत्रातून भंडारा जिल्ह्याचे एकमात्र संस्थेची परिवर्तन शिक्षण संस्था वासेळा या संस्थेची निवड या पुरस्काराकरीता करण्यात आलेली आहे. या पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तींना मुंबई येथे कार्यक्रम ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. पुरस्कारार्थी यांची निवास, भोजन व मुंबई दर्शनाची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यातील विभागाचे समाज कल्याण अधिकारी प्रत्यक्ष पुरस्कारार्थी यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *