करडी पोलीस स्टेशनला गौरक्षनाथ नागलोथ ठाणेदार म्हणून रुजू
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- करडी पोलीस स्टेशन येथे नव्याने आलेले ठाणेदार गौरक्षनाथ नागलोथ यांनी सुधीर बोरकुटे यांचे कडून पदभार स्विकारून एकमेकांना पुष्प गुच्छ देवून स्वागत केला. करडी पोलीस स्टेशनला या अगोदर आलेले ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी पाच महीने करडी पोलीस स्टेशन पदभार घेतला होता. त्यांची बदली नागपूर येथे झाली असून पाच महीण्याच्या कालावधीत अवैध रेती वर आळा घातला होता तसेच मोहफुल हातभट्टी, सट्टा पट्टी सुध्दा बंद केली होती.
पाच वेळा जुगारावर धाड मारून आरोपीवर कारवाई केली असल्यामुळे सुधीर बोरकुटे यांचा सहा महिने कार्यकाळ चांगला राहीला.करडी पोलीस स्टेशन ला नव्याने रुजू झालेले ठाणेदार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितले की, आपल्या करडी पोलीस स्टेशन च्या बिट हद्दीत होणाऱ्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करु व अवैध धंदे चालणार नाही अशी सुध्दा यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे नविन आलेले ठाणेदार गौरक्षनाथ नागलोथ हे खरोखर करडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत होणाऱ्या अवैधरित्या धंद्यांवर आळा घालतील काय याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.