
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पंचायत समिती तुमसरचा उपसभापती पद भाजपाचा गड म्हणून ओळख असलेले व राजकारणाचे प्रभावी तशेच भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते व सिदूपुरीचे माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरचे माजी संचालक, दि. सहकारी राईस मिल सिहोराचे माजी उपाध्यक्ष तथा कार्यरत संचालक सुभाष बोरकर यांनी उप सभापती पद काबीज करून सिंदपुरी गावाचा एक इतिहासच घडविला आहे. सिंदपुरी गावाचा इतिहास घडविणारे सुभाष बोरकर हे तिसरे उपसभापती आहेत. सिंदपुरी हे आदर्श गाव म्हणून भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर सर्व दूरपर्यंत गजबजलेले गाव आहे.सिंदपुरीचे माजी सरपंच स्व. मदन भाई दुबे यांनी आदर्श गाव म्हणून जिल्ह्यात सर्वप्रथम पुरस्कार मिळविला आहे. या गावाने तंटामुक्त पुरस्कारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कृषी पंडितांची पदवी धारण करुन पद्मभूषण मिळविलेले स्व.शामसुंदर बोरकर यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व पंचायत समिती तुमसरचे उपसभापती पद सुद्धा भुषविले होते. सुभाष बोरकर यांचे बंधू सुंदर बोरकर हे सुद्धा पंचायत समिती तुमसरच्या उपसभापती पदावर विराजमान होते, हे उलेखणीय आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती तुमसरच्या निवडणुकीत सुभाष बोरकर यांची उप सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याने सुभाष बोरकर हे आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या सिंदपुरी गावाचे बोरकर हे तिसरे उपसभापती समजले जात आहेत. आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या सिंदपुरी गावात उत्साह व नागरिकांच्या मनात आनंद खदखदत आहे.