अवैध डिझेल वाहतूक करणारी बोलेरो गाडीवर कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- पोलीस स्टेशन गोबरवाही अंतर्गत ठाणेदार शेवाळे हे स्टापसह पेट्रोलींग करीत होते खापा चौरस्तावर आरोपी बोलेरा गाडी क्र. एम पी ५० टि ०२४० चा चालक १) मणीश रामसिंग कंभरे वय २४ वर्षे रा. गोरेघाट म. प्र. गाडी मालक व लंकेश नथ्थु कोरडे (३०) रा. गोरेघाट म. प्र. हे त्यांच्या चारचाकी गाडीत प्लास्टीक कॅनमध्ये डिझेल वाहतुक करतांना मिळुन आले.

आरोपीतांच्या ताब्यातील चारचाकी गाडीची पाहणी केली असता त्यांच्या गाडीत मागील बाजुला एकुण १४ वेगवेळ्या रंगाच्या प्लास्टीक कॅनमध्ये एकुण ५०४ लिटर डिझेल प्रती ८५ रू. लिटर प्रमाणे एकुण किमती. ४२,८४० रू. चा माल व बोलेरो गाडी क्र. एम पी ५० टि ०२४० कि. ५,००,००० रू.असा एकुण ५,४२,८४० रू चा माल अवैद्यरित्या वाहतुक करतांना मिळुन आला. त्यांना सदर मालाबाबत विचारपुस केली असता त्याच्याकडे डिझेलचे कोणतेही कागदपत्रे नसल्याचे सांगीतले.

आरोपी क्र. ०१ व ०२ यांनी त्यांच्या ताब्यातील चारचाकी बोलेरो गाडीत बेकायदेशीरित्या कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे न बाळगता डिझेल द्रव्य वाहतुक करतांना मिळाल्याने आरोपीतांना अत्यावश्यक वस्तु अधिनीयम १९५५ कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा केला असुन नमुद आरोपीतांना सदर कलमान्वये गुन्हा नोंद करून करून तपासात घेतला. सदरच कारवाई पोलीस अधिक्षक नूरुल हसन व अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शेवाळे, पो. हवा. राघोर्ते ९६०, पोलीस स्टेशन गोबरवाही यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *