पेयजल योजना तत्काळ पूर्ण करा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा विधान सभा क्षेत्रा अंतर्गतच्या भंडारा आणि पवनी या दोन्ही नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांसह शहरातील समस्यांचा आढावा आज आम. नरेंद्र भोंडेकर यांनी घेतला. दोन्ही ठकणी झालेल्या आढावा बैठकीत माजी नगर सेवकांनी आपल्या समस्या मांडल्या ज्यावर आम. भोंडेकर यांनी तत्काळ कार्यवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विशेष म्हणजे शहरातील पेयजल योजनेची उर्वरित पाईप लाईन लवकरात लवकर टाकून व त्या योजनेच्या टांकी ला जोडून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या कंत्राटदार व अधिकाऱ्यास देण्यात आले. भंडारा व पवनी नगर परिषद अंतर्गत आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रयत्नाने आनण्यात आलेल्याविविध योजनेची विकास कामे सुरू असून गेल्या काही काळात या कामांची गती संथ झाल्याचे आम. भोंडेकर यांच्या लक्ष्यात आले.
या करीता आज आम. नरेंद्र भोंडेकर यांनी तडका फडकी दोन्ही नगर परिषदेत आढावा बैठक घेण्याचे ठरविले आणि ज्या करीता दुपारी १२ वाजता भंडारा नगर परिषद आणि सायंकाळी ४.३० वाजता पवनी नगर परिषदेत बैठक घेण्यात अली. या बैठकीत समस्त माजी नगर सेवक यांनी उपस्थित राहून त्यांच्या प्रभागात सुरू कामांमध्ये येत असलेल्या अडचणी आम. भोंडेकर यांच्या समक्ष मांडल्या. ज्यात सर्वात महत्वचे म्हणजे पेयजल योजनेचे काम संथ गती ने सुरू असून पाईप लाईन टाकून झाल्यावरही पाणी मिळत नसल्याचे सांगण्यात आले. ज्यावर आम. नरेंद्र भोंडेकर यांनी संबंधित विभाच्या अधिकारी आणि ठेकेदारस खडसावून सांगितले की ज्या क्षेत्रात पाईप लाईन टाकण्यात अली नाही तेथे पाईप टाकून पाणी पुरवठा सुरळीत करावे. अन्यथा ठेकेदारवर दंडात्मक कार्यवाई करण्याचे निर्देश आम. भोंडेकर यांनी नगर परिषद च्या मुख्य अधिकाऱ्यांना दिले. या व्यतिरिक्त अतिक्रमण धारकांचे पट्टे वाटप, घरकुल योजना व त्यांची मंजूरी, शहरातील आरोग्य व स्वच्छता सह सांडपाण्याच्या योजने संदर्भातही चर्चा करून आम. भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.