सुगंधित तंबाखू बाळगळणाऱ्या ईसमावर कारवाई
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी वरठी हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान सुगंधीत तंबाकु बाबत रेड केली. आरोपी जयप्रकाश प्रजापती वय ५८ वर्ष रा. सुभाष वार्ड वरठी हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू एकूण किंमती २९,५९५/- रु चा माल विक्री करण्याचे उद्देशाने बाळगताणी मिळून आला. आरोपीविरुद्ध पो. स्टे. वरठी कलम २२३, १७२,१७४,१२३ भा. न्या. सं.२०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक नूरुल हसन व अपर पोलीस अधिक्षक, ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पो. नि. नितीन चिंचोळकर, मार्गदशनात पो. हवा. दोन्होडे, पो. हवा. मस्के, यांनी केली.