आमदार विनोद अग्रवाल यांचा जन सेवा शिबिर संपन्न – एक छताखाली, हजारो उपाय, अनगिनत हास्य, असं शिबिर न पाहिलं न ऐकलं
गोंदिया:- खरा लोकप्रतिनिधी तोच, जो केवळ वचने न करता ती प्रत्यक्षात उतरवतो आणि जनतेच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतो. गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्यांच्यासाठी जनसेवा ही एक राजकीय औपचारिकता नसून एक पवित्र मिशन आहे. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत ९ ते ११ जून २०२५ दरम्यान ग्रीनलँड लॉन, रिंग रोड, गोंदिया येथे तीन दिवसीय भव्य जन सेवा शिबिर आयोजित करण्यात आले, जे स्वतःमध्येच ऐतिहासिक ठरले. या शिबिरात ७००० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेत केंद्र व राज्य शासनाच्या २५ पेक्षा अधिक योजनांचा थेट लाभ घेतला.