प्रेमाचे प्रतीक असलेल्या सारसची गणना : गोंदिया जिल्ह्यात आढळून आले ३६ सारस पक्षी…..

गोंदियाः- सोमवार, १६ जून रोजी सकाळी ५ ते ९ या वेळेत गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात वार्षिक सारस पक्षी गणना करण्यात आली. इच्छुक स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, विभाग आणि पक्षीप्रेमी या गणनेत सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय गोंदिया येथे नोंदणी केली होती. गोंदिया वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी गोंदिया जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या सारस गणना मध्ये एकूण ३६ सारस पक्षी आढळून आले आहेत. ही आनंदाची बाब आहे कारण ही संख्या मागच्या दोन वर्ष २०२३ आणि २०२४ च्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या वर्ष २०२३ च्या गणनेत १२ आणि २०२४ च्या गणनेत २३ सारस पक्षी आढळून आले होते.

मध्यंतरी काही सारस पक्षी चा विविध कारणांनी मृत्यू पण झाला होता. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेत यावर विशेष उपाययोजना करण्यात आल्या त्यामुळे यावर्षी त्याचे फलित सारस ची संख्या वाढ मधून दिसून येत आहे. शिकारी मुळे ही सारस ची संख्या कमी होत चालली होती. पण सरकार आणि वन विभागाने या पक्ष्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी पावले उचलली आहेत. गेल्या वर्षी झालेल्या सारस गणनेत जिल्ह्यात २३ सारसची नोंद झाली होती. त्यापैकी २३ क्रेन गोंदिया वनक्षेत्रात आढळून आल्या. पारंपारिक आणि शास्त्रीय पद्धती वापरून सारसची गणना केली जाते. त्यामुळे सारसच्या संख्येचा अंदाज अचूक येतो. विशेष म्हणजे सारसचा अधिवास राज्यातील फक्त गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातच दिसून येतो. याशिवाय, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातही सारस पक्षी आढळतात. १६ जून रोजी सकाळी ५ वाजता, गोंदिया वन परिक्षेत्र अधिकारी आणि सर्व कर्मचारी, वन कर्मचारी, धर्मादाय संस्थांचे अधिकारी, पक्षीप्रेमी आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत परिसरातील सुमारे २५ ठिकाणी सारस पक्षी गणना केली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *