वसंत नेमा यांच्यावर कारवाई करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली डॉक्टरांची फसवणूक करणारे वसंत नेमा व त्यांचे दोन्ही मुले यांचेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सविस्तर असे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मागील आठवड्यात भंडारा शहरातील नेमा कुटुंबीयातर्फे काही पालकांना त्यांच्या पाल्यांना एमबीबीएस, एमडी, डिप्लोमा कोर्सेस करिता विदेशामध्ये ऍडमिशन घेण्याच्या नावाखाली करोडो रुपयांनी चुना लावलेला होता.

या प्रकरणात या वसंत नेमा यांच्या बँक खात्यातून आर्थिक देवाणघेवाण झाली होती. ते वसंतनेमा मात्र कारवाईतून मुक्त कसे या संबंधिचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे विरोधी पक्ष नेते आ. अंबादास दानवे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नरुल हसन यांना निवेदन दिलेले होते. परंतु दहा दिवस उलटूनही वसंत नेमा यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आज या प्रकरणाची चौकशी अधिकारी चोकणे तसेच पोलीस अधीक्षक नरुल हसन यांची भेट घेऊन वसंत नेमा यांच्यावरती कारवाईची मागणी करण्यात आली. कार्यवाही न झाल्यास शिवसेना आंदोलनाच्या पावित्र्यात असेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भाऊ रेहपाडे, शहर प्रमुख राकेश आग्रे, तालुकाप्रमुख तिलक सारवे, विनोद डाहारे, संदीप गभने हे शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *